प्रकरण १०मिसेस धुरी पाणिनी पटवर्धन ला भेटून गेल्यानंतर सौम्याने आपली खुर्ची पाणिनीच्या टेबल जवळ घेतली आणि काळजी युक्त स्वरात म्हणाली,“सर मला काळजी वाटते आहे. हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?”“सौम्या मला अजूनही खात्री नाही की मी नक्की कुणाचा वकील आहे. वरकरणी मी निनाद धुरीचा वकील आहे पण त्याला असं वाटतंय की मी कियान साठी सर्व काही करावं. आपल्याकडे आत्ता जो काही पुरावा आहे त्या आधारे निनाद धुरीला मी या लफड्यातून बाहेर काढू शकतो. पण ज्या क्षणी मी हे करीन त्या क्षणी त्याच्या बायकोवर खुनाचा आरोप येऊ शकतो. सर तुम्ही निनाद धुरीला सांगणार आहात की त्याची बायको डॉक्टर बंब यांच्या क्लिनिक