प्रकरण ९ दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता लीना धुरीचा पाणिनीला फोन आला आणि एकदम तारस्वरात ती ओरडली,“शेवटी ते झालंच मिस्टर पटवर्धन. पोलीस आले, आणि निनाद ला घेऊन गेले. ते म्हणाले की डॉक्टर बंब यांच्या खुनाच्या संशयावरून आणि पुरावा दडवण्याच्या संशयावरून ते त्याला घेऊन जात आहेत.” “ठीक आहे, मला अंदाज होताच तो. पण तुला वाटतं ना मी दिलेल्या सूचना तो पाळेल?” पाणिनीने विचारलं. “माझी मनापासून इच्छा तर आहे की तो पाळेल. शेवटी आमच्या मुलाचं,कियानचं सुख आम्हाला महत्त्वाचं आहे आम्ही त्याचे खरे आई-वडील नाही हे त्याला कळलं तर केवढा मोठा अनर्थ होईल.” “पण तुला खात्री नाही वाटत आपल्या नवऱ्याबद्दल?” पाणिनीने विचारलं.“नाही. खात्री देऊ शकत मिस्टर