किंकाळी प्रकरण 8

  • 393
  • 135

प्रकरण 8 पाणिनी धुरीला त्याच्या घरापर्यंत घेऊन आला तेव्हा धुरीची बायको दारातच उभी होती ती पळतच आपल्या नवऱ्याकडे आली “निनाद सगळं काही ठीक आहे ना?” धुरीन त्याचं व्यावसायिक हास्य आपल्या चेहऱ्यावर आणलं. “सगळं काही नियंत्रणात आहे काळजी करू नको” तो तिला म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर पाणिनीसाठी कृतकृत्यतेची भावना वाढली.“ खूप वेळेवर आलात तुम्ही.” ती त्याला म्हणाली “पटवर्धन आले तिथे घाईघाईत पण खरंतर त्याची काही गरज नव्हती. मी व्यवस्थित हाताळली होती परिस्थिती. आणि मिस्टर खांडेकर खूपच सहकार्य करणारे होते आम्ही आता चांगलेच मित्र झालोय.” निनाद म्हणाला.“निनाद, तू काय सांगितलं त्याना?” त्याच्या पत्नीने विचारलं “काय म्हणजे? जी काही वस्तुस्थिती होती ती. त्यात दडवण्यासारखं मला काही नव्हतं. म्हणजे मला ती