किंकाळी प्रकरण 7

  • 384
  • 126

प्रकरण ७साडेनऊ वाजता पाणिनी पटवर्धन सरकारी वकील खांडेकरांच्या ऑफिसमध्ये पोहोचला खांडेकर आत आहेत का याची त्यांने त्यांच्या सहाय्यकाकडे चौकशी केली. ते बाहेर असल्याचं त्याला सांगण्यात आलं. “माझा एक क्लायंट इथे आलाय.” “कोण?” “निनाद धुरी. त्याला भेटायचय मला इथे.” “त्यासाठी खांडेकर यांची परवानगी घ्यायला लागेल घ्यायला, मला.”  सहाय्यक म्हणाला.“त्यांना सांगा. मी इथे आलोय म्हणून.”  पाणिनी म्हणाला. “मला अधिकार नाहीये तसं कळवण्याचा.”“तुम्ही प्रमुख आहात ना इथे ?”“मी इथे नोकरीला आहे. प्रमुख वगैरे नाही.” “तुम्हाला इथे काहीच अधिकार नसेल तर मला माझे अधिकार वापरावे लागतील.” पाणिनी म्हणाला आणि त्या अधिकाऱ्याचा विरोध धुडकावून लावत खांडेकरांच्या केबिनच्या दारात जाऊन उभा राहिला आणि दार खडखड वाजवलं. खांडेकर बंद खोलीमध्ये कुणाशी तरी बोलत होते आणि पाणिनीने