प्रकरण ६दुसऱ्या दिवशी पाणिनी खरोखर सकाळी पावणे आठ वाजता कनक ओजस च्या ऑफिसात हजर झाला.कनक थोडा उशिराच आला.“ उशीर झाला तुला म्हणजे माझ्या कामात काही प्रगती केलीस असं म्हणू शकतो का मी? ” पाणिनीने विचारलं.“ डॉ.बंब यांच्या घराच्या पुढच्या दारातून बाहेर पळालेल्या मुलीचं पोलिसांना सविस्तर वर्णन मिळालंय पाणिनी.”पाणिनीने काहीही न बोलता एक सिगारेट शिलगावली. कनक पुढे सांगायला लागला,“ पोलिसांनी अक्षरशः काही मिनिटातच तिचा पाठलाग सुरु केला तरी सुद्धा ती त्यांची नजर चुकवून गायब कशी काय झाली याचं पोलिसांना कोडं पडलंय.”“ गाडीत बसून अल्पावधीत खूप लांब जाता येतं, कनक.” पाणिनी म्हणाला.“ तिच्याकडे गाडी होती आणि ती जवळच लावली होती असं गृहीत