किंकाळी प्रकरण 5

  • 354
  • 105

प्रकरण ५मोजून पंधरा मिनिटांनी सौंम्याने प्रज्ञा पांडवच्या दाराची बेल वाजवली होती.दारात एक सुंदर स्त्री उभी होती.“ यस? काय हवयं?” तिने विचारलं.“ मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.”“ बरं मग?” तिने विचारलं.आणि त्याच्या मागच्या सौंम्याकडे पाहिलं.“ ही माझी सेक्रेटरी सौंम्या सोहोनी.”तिच्या तोंडावर पुसटसं हास्य उमटलं.“ आम्ही आत येऊ का?”  पाणिनीने विचारलं.“ सॉरी, माझा अजून स्वयंपाक व्हायचाय.आणि नंतर मला एकाला भेटायला जायचंय”“ मला बोलायचंय”  पाणिनी म्हणाला.“ खरंच वेळ नाही.”“ डॉक्टर बंब यांच्या बद्दल.”  पाणिनी म्हणाला.क्षणभरच तिच्या चेहेऱ्यावर जरासा संभ्रम दिसला पण पटकन ती म्हणाली, “ मला कोणी डॉक्टर बंब वगैरे माहित नाहीत.”“ माहित्येत तुला.”  पाणिनी म्हणाला. आणि तिने मान हलवून नाही म्हंटलं.“ आणि निनाद