किंकाळी प्रकरण 4

  • 231
  • 93

प्रकरण ४ “या दुसऱ्या मुलीची काय भानगड आहे? ” बाहेर आल्यावर सौम्याने पाणिनीला विचारलं. “ डहाणूकर नवरा बायको सोडून तिच्याबद्दल कुणालाच माहीत नाही. आणि आता आपल्या दोघांना माहिती आहे. तू जी टिप्पणी घेतलीस आमच्या संवादाची त्याच्यातून हे सिद्ध होईलच की ही दुसऱ्या बाईची भानगड त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे असं मी त्याला सांगितलं आहे म्हणून.”  पाणिनी म्हणाला. “ प्रत्येक गोष्ट आम्ही सविस्तर लिहून घेतल्ये मी. आणि त्याच्यात तुम्ही दिलेला सल्ला तर अधिकच व्यवस्थित लिहून घेतला आहे.” सौम्या म्हणाली. पाणिनी समाधानाने हसला.“ चल आता आपण त्या घरघड्याला भेटू.” थोड्याच वेळात पुरीच्या दारावरची बेल सौम्याने वाजवली काही क्षणात दार उघडलं गेलं. एक माणूस दारात उभा होता. पाणिनी