प्रकरण ३पाणिनी आणि सौम्या सूर्यदत्त मार्गावरील डॉक्टर बंब यांच्या पत्त्यावर पोहोचले डॉक्टरांचा बंगला टेकडीच्या उतारावर होता दोन कार साठी पार्किंग व्यवस्था होती आणि त्यावर एक टुमदार बंगला होता. "डॉक्टरांना भेटायच्या आधी आपण त्यांचे शेजारी डहाणूकर यांना आधी भेटू त्याच्यानंतर डॉक्टरांचा गडी जो टॉवेल गुंडाळून बाहेर बघायला आला होता त्याचीही मुलाखत घेऊ" पाणिनी म्हणाला.त्याने डहाणूकरच्या दारावरील बेल वाजवली दारात एक माणूस येऊन उभा राहिला "मी मिस्टर पटवर्धन आहे आणि ही माझ्या बरोबरची सौम्या सोहोनी." आपली ओळख करून देत पाणिनी म्हणाला."ठीक आहे. मी अनुमान डहाणूकर." दारात उभा असलेला माणूस म्हणाला. पण त्याच्या चेहऱ्यावर ना शत्रुत्वाचे भाव होते ना मित्रत्वाचे. आपल्याकडे आलेला पाहुणा पुढे काय