..........आम्ही त्या खोलीत गेलो. दाराला किल्ली लावलेली होती. आम्ही आत गेलो. आत कुणाचीही चाहूल नव्हती. अंथरुणावर कोणीतरी झोपल्याच दिसत होतं. म्हणजे बिछाना वापरल्याचं दिसत होतं पण कोणीही नव्हतं.” ....पुढे.....प्रकरण २धुरी ने दिलेलं उत्तरं ऐकून पाणिनीला आश्चर्य वाटलं नाही. त्याने पुढे चौकशी चालू ठेवली.“नंतर काय पुढे?” “बस एवढंच. हीच सगळी गोष्ट मला सांगायची होती. मला वाटतं ती सकाळी लवकर उठून किल्ली दारालाच ठेऊन निघून गेली असावी. माझ्या बायकोला भीती वाटते की मी कशात तरी अडकलो असणार. त्या रिसेप्शनिस्ट ला सुद्धा आमचा संशय आला असावा असं मला आता वाटतं आहे. पण आता त्याला काही इलाज नाही. काही झालं तरी मला माझ्या घरीच यायचं होतं. त्यामुळे