जागृत देवस्थानं - भाग 5 (अंतीम भाग)

  • 438
  • 1
  • 153

दादा  ग्रामदेवीला  नारळ   ठेवायला  गड्यांसोबत निघाला तेंव्हा त्यानाही असाच अनुभव आला रस्त्यात भेटणारा माणूस त्यांच्या पृच्छेला  उत्तर न देताच तोंड फिरवून जाई. सोबतच्या  गड्यांपैकी एकजण माहितगार असल्यामुळे  त्याना  देवळात जाता आले.  गाभाऱ्यासमोर  नारळ ठेवून दादा अपेक्षेने वाट पहात राहिला. पण समोरच्या माणसाचा  नारळ मानवून  देवीला गाऱ्हाणे  घातल्यावर  दादाकडे  नजरही न वळवता गुरव  बाहेर जावून बळाणीवर बसला. मग दादाने बाहेर जावून त्याला  आपला नारळ मानवून गाऱ्हाणे घाल म्हणून सांगितल्यावर गुरव त्याच्या नजरेला नजर भिडवीत म्हणाला, “मी तुमचा गाराणां  घालूक शकत नाय. गावाचो तसो हुकूम नाय. ह्येच्या पलिकडे माका काय इचारू नुको नी मी बोलणार पण नाय.......”         दादा महाजन