जागृत देवस्थानं - भाग 4

  • 1

पूर्ण विचार करता  कोर्टाचा बेलिफ़ नी  पोलिस पार्टी  आल्यावर  मिळकतीचा ताबा सोडावाच लागणार हे अटळ भवितव्य ध्यानी घेता  चारही  दांडेकर बंधूनी  सूज्ञ  विचार करून  रोकड आणि  सोने चांदी  असा महत्वाचा ऐवज  गुठाळून  दोन भाऊ  बायका माणसे नी  मुले याना घेवून  तत्काळ  पळसंब्यात  मामाकडे रवाना झाले. लिलावाला  अजून  चार दिवस अवधी होता. राहिलेल्या  दोन भावानी  गुरे ढोरे गावातल्या  कुळाना  वाटून टाकली. मोठी हांडी भांडी होती  ती   गावदेवीला   दान म्हणून देवून टाकली  आणि दुसरा  दिवस उजाडता उजाडता  वाड्यासमोर  उभे राहून  वास्तू देव आणि  ग्रामदेवी  काळकाई  यांची प्रार्थना करून  याचा फैसला तुम्ही करा. आम्ही  या मिळक्तीवर तुळशी पत्र ठेवून पाय नेतील तिथे परागंदा