" इतिहासाचे एक पान " इतिहासातील एक घटना ज्या घटनेने या हिंदुभुमीचे प्राक्तनच बदलून टाकले, आई जिजाऊंच्या डोळ्यात ज्वाला पेटविल्या, मोगली सत्ता उलथवून स्वराज्य स्थापनेची जिद्द, स्फुल्लिंग, प्रेरणा, ठाम निश्चय त्या माऊलीच्या खदखदणाऱ्या हृदयात निर्माण केला. ती घटना घडली २५ जुलै १६२९ रोजी देवगिरी किल्ल्यावर… १६२४ च्या भातवडी युद्धानंतर शहाजीराज्यांच्या पराक्रमाची कीर्ती हिंदुस्थानच्या दाही दिशांना पसरली. जरी या युद्धात निजामाची सरशी झाली असली तरी लखुजीराजे भातवडीच्या युद्धानंतर शहाजीराज्यांच्या प्रभावात आल्याने त्याची चिंता जास्तच वाढली. एकतर शहाजी राज्यांचे सासरे लखुजीराजे आणि त्यांची सेना अदिलशाहकडून लढले असूनही सुरक्षित राहिली. निजामाने लखुजीराजेचा