प्रिन्सी तर झोपली होती ! पण आम्हा दोघांना झोप येत नव्हती . कारण हे दोघे कधी असे उशिरा नव्हते आले ... मनन ची आई सतत मला सांगायची ... अहो ! कुठे आहेत ते बघा ? इतका उशीर झाला त्यांना ? मी म्हणायचो असूदे ! एक दिवस त्यांना जरा वेळ देऊ दे! एकमेकांना ! येतील ते थोड्यावेळात ! उगाच त्यांना सारखं कॉल करून त्रास नको द्यायला !त्या रात्री आम्ही त्या दोघांची खूप वाट पाहिली ..वाट पाहता पाहता सूर्य समोर येऊन उभा राहिला होता . पण हे दोघं काही घरी आले नाही . आमच्या दोघांची काळजी खूपच वाढली होती. काही