आर्या ( भाग ११ )

  • 615
  • 231

    अनुराग ने श्वेता ला हळूच डोळ्यांनी इशारा करून शांत राहण्यासाठी सांगितलं. आजी आजोबा इतके शांत होते की श्वेता खाली मान खाली करून बसली होती . आजी आजोबा कस उत्तर देणार हे तिला कळत नव्हतं! थोड्याच वेळात आजोबा म्हणाले तसं तुम्हाला सांगायला काही हरकत तर नाही, पण इतकंच पुन्हा पुन्हा त्याचं भयानक आठवणी जागा होतात इतकचं !   अनुराग पुढे होऊन आजोबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला , " बाबा ! तुम्हाला जर मनापासून सांगावस वाटत असेल तर तुम्ही सांगा , स्वतःला त्रास करून आणि आम्हाला बर वाटेल म्हणून नको !"तितक्यात बाबा पुढे म्हणाले," अरे मुलांनो त्रास कोणाला होणार नाही ?