ते झाड - मागं वळून बघू नकोस - 5

  • 378
  • 171

Chapter 5 : जुनं रेकॉर्डिंग दत्ता काकांचा मृत्यू झाला ... झाडाजवळ . चेतन पुन्हा गायब. गावात शांतता होती — किंवा सांगायचं तर, भीतीने गोठलेली शांतता. प्रत्येकजण आता सावध, घराबाहेर पडायला कोणीही तयार नव्हतं . प्रियंका मात्र शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती . चेतनचा फोन दत्ता काकांच्या मृत्यूनंतर तिच्या मनात सतत एक प्रश्न घोळत होता — झाड त्याचं बळी का घेतंय? चेतन पुन्हा हरवला , पण का ? शेवटी ती चेतनच्या सामानाकडे वळली , जे त्याच्या खोलीत अजून तसंच पडून होतं . तिथेच तिला एक फाटकी बॅग सापडली . आत काही जुनी पुस्तकं, एक वही … आणि एक स्मार्टफोन. चेतनचा मोबाईल . फोन