ते झाड - मागं वळून बघू नकोस - 4

  • 597
  • 273

Chapter 4 : दुसरं बळी   त्या रात्री झाडाजवळून प्रियंका जेव्हा घरी परतली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता ... पण डोळ्यांत विचित्र शांतता होती. तिनं चेतनचं लॉकेट घेतलं होतं, आणि मौली आजीची गुंडी आता निष्क्रिय वाटत होती. पण तिला एक गोष्ट समजली होती —  झाड शांत झालेलं नाही. फक्त थांबलंय ... सुद्धा, जसं एखादा शिकारी सावध होत थांबतो. चेतन परततो दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खळबळ उडाली. दत्ता काकांच्या गोठ्यात एक मुलगा बेहोश अवस्थेत सापडला होता. चेहरा धुळीने भरलेला, कपडे फाटलेले, आणि केस मातीने भरलेले. " हा ... हा चेतन आहे ! " एकाने ओरडताच गावकरी जमा झाले . प्रियंका धावत