ती उठली.....ती पेटली

  • 906
  • 273

मुंबईचं रात्रीचं आकाश शांत होतं, पण त्या शांततेच्या आत एक कोसळलेली वादळं दडली होती — एका तरुणीच्या अंतर्मनात.चौथ्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये, अंधारात निवांत बसलेली अनया स्वतःच्या श्वासांचाही आवाज ऐकत होती.दार बंद. फोन बंद. बाहेरच्या जगाशी तिचा काहीही संबंध नव्हता.केवळ एक प्रश्न तिच्या मनात घोंगावत होता — "माझं काय चुकलं?"अनया – वय २४.स्वतःच्या कष्टाने शिकलेली. इंजिनीअरिंग केलं, मोठ्या MNC मध्ये नोकरी मिळवली.आई-वडिलांचा आधार, मित्रमंडळींचा अभिमान, आणि स्वतःसाठी उभं करणं सुरु केलेलं आयुष्य.तिच्या आयुष्याचा प्रवास सुरू होताच होता… आणि एका रात्रीने सगळं उद्ध्वस्त केलं.---त्या दिवशी ती ऑफिसहून उशिरा बाहेर पडली होती.नेहमीप्रमाणे एका मोबाईल App वरून गाडी बुक केली.गाडी आली, ती बसली, रूटही