* गर्व हरण * तसं अनंतपूर हजार दीड हजार वस्ती असलेलं गाव विविध वृक्ष-वल्लीनी वेढलेलं. गावालगतच दाट वनराईने, हिरव्या गर्द वनश्रीने नाटलेलं जंगल होतं. या छोटेखानी जंगलात जुन्या काळातील एका तपस्व्याचा आश्रम आहे. आजही ऋषीं-मुनी, साधू-संन्याशी त्या आश्रमात थांबतात अन पुढील तीर्थाटणाला निघून जातात. विसाव्या शतकात अनंतपूरी नामांकित व नावाजलेल्या नाना कला निपुण व्यक्ती होऊन गेल्या व आहेत. आजही गावकऱ्यांच्या त्यांच्या जीवन-कथा स्मरणात आहेत.. त्या ऐकीव माहिती-कथा आपणास ते ऐकवतात. बऱ्याच गावी गेलो तेव्हा धर्मा कुंभाराचा पोरगा रामा राऊत याची भेट झाली. चहा-पाणी झालं. ख्याली-खुशाली विचारून झाली. रामा