निक्की

त्या लहान गावात माझी बदली झाली तेव्हा माझी आणी निक्कीची गाठ पडली खरे म्हणजे तीचे नाव निकिता आहे पण तीच्या घरचे आणि जवळचे सारे तीला प्रेमाने निक्कीच म्हणतात दोन भावांची एक अत्यंत लाडकी बहीण आणी तिच्या पप्पांची जीव की प्राण असणारी ..लेक !!त्यांचे प्रेम पाहुन मला माझी आणी माझ्या वडिलांची अशीच असलेली जोडी नेहेमीच आठवायची!!आमच्या पहिल्या भेटीतच आमची इतकी  मस्त गट्टी जमली होती की मी तर तीला पहिल्या भेटीतच निक्की म्हणु लागले .मग सुरु झाला आमच्या मैत्रीचा एक प्रवास ....वाचन, स्वयंपाक ,फिरणे, या आमच्या आवडी निवडी अगदी पक्क्या जमल्या .शिवाय माझ्या लेखनाची तर ती एक “पंखा “..होतीच  मला जशी पुर्वी इंग्रजी कादंबरी वाचायची आवड होती (सध्या हे