वात"वात एकच… पण स्थळ वेगवेगळं!" "वात म्हणजे – स्वतः जळून इतरांसाठी उजेड करणाऱ्या श्रद्धेची शांत ज्योत!"देवळाच्या मागच्या खोलीत आज खूप गडबड होती. नवरात्र जवळ आलं होतं. सजावट, रंगोळ्या, देवाच्या आराशात नवीन वस्त्रं – सर्व तयारी सुरू होती. पण या सगळ्याच्या पलीकडे एका कपाटात, काही जुन्या, काही नव्या, काही चकाकणाऱ्या, काही गहिऱ्या तेलाने माखलेल्या दिव्यांचं आपसात संभाषण सुरू होतं.त्या कपाटात होते –पितळी समई, कंदील, पणती, नंदादीप, दीपमाळ, आरतीचं निरांजन, तुपाचा दिवा, आणि ताम्हणातील खास पूजा निरांजन.पहिली समई म्हणाली –“मी दिवसभर नाही, पण पूजेच्या वेळी देवाच्या उजवीकडे ठेवली जाते. चार वाती, सुंदर सजावट… सगळं वातावरण मी उजळून टाकते.”काठावरच्या पणतीने डोळे मिटले. तिचं रूप