पत्रकार धोंडीराम धोत्रे - 6

             भाग ५ : धोंडिरामचा खास रिपोर्ट"पोट कुरकुरतं तेव्हा बातमी खवळते!"हा माझा ठाम सिद्धांत आहे. आणि माझ्या पत्रकारितेच्या ‘पोटातून आलेल्या’ करिअरमध्ये अनेक वेळा तो सिद्ध झालाय!...पण वाड्याच्या विहिरीच्या प्रकरणात तर त्याने अगदी सळसळतं यश मिळवलं!झालं असं की –एक दिवस माझं पोट रेस्टॉरंटच्या ताटावर नव्हे, तर बातमीच्या उकळीवर कुरकुरायला लागलं.गण्या गावकरी, जो दर आठवड्याला पायातल्या चप्पलइतका बदलतो पण चेहरा कधीच नाही, त्याने मला एका गूढ टिपचं बोळं हातात दिलं –"धोंडीराव, या पन्हळवाडी गावात एक वाडा आहे… आणि त्याच्या विहिरीतून रात्री विचित्र आवाज येतो!"मी लगेच जळगाव एक्सप्रेसच्या वेगाने निघालो,टॉर्च, टिपण नोंदवायचं वहितं, आणि… हो, माझी पोटसफाईची गोळी