भाग ४ : सत्याचा उलगडा"‘रमा – १८२२, श्रावण पौर्णिमा’…! हंss! त्या तांब्यावर कोरलेलं नाव आणि तारखेनं तर माझ्या झोपेचं बारा वाजवले. जणू माझं डोकंच त्या तांब्यासारखं रिकामं झालं होतं. पण आतून रहस्यमय धातूने भरलेलं! रात्रभर मी उशाशी तो तांबं ठेवून झोपायचा प्रयत्न केला, पण काय सांगू? प्रत्येक वेळी डोळा लागला की वाटायचं. एखादी साडी नेसलेली, केस मोकळे केलेली बाई येतेय आणि म्हणतेय, 'धोंडीराम, मला शोध… मी श्रावणात हरवलेय!'आता बघा, तांबं हातात घेतल्यापासून माझ्या विचारांचं चक्रीवादळ उठलं होतं. पाण्याचा आवाज ऐकला की वाटायचं, कुणीतरी विहिरीतून 'हेलो!' म्हणतंय. सावली दिसली की वाटायचं, 'ही