पत्रकार धोंडीराम धोत्रे - 4

  • 480
  • 171

                 भाग ३ : रात्रीची मोहीमगावातलं सायंकाळचं शांत वातावरण काहीतरी कुजबुजतं होतं. पक्ष्यांनी झाडांवर बसून गोंधळ घालणं थांबवलं होतं, आणि आता फक्त झाडांच्या फांद्यांमधून वारा ‘हश्श… हश्श…’ करत वाजवत होता. भिकू काकांनी सांगितलेल्या गोष्टी पुन्हा एकदा मनात पुटपुटल्या . रमाबाईचं ओलं भूत, पायांशिवाय साडीतील बाई, आणि टपटप टपकणारं कुंकू!माझ्या पोटातली बातमीभूक जोरात चिवचिवायला लागली. एका बाजूला मन म्हणत होतं, “धोंडीराम, इतकं काय विचार करतोयस? एक चहाचा कप घे आणि घरी झोपी जा.”पण दुसऱ्या बाजूने पत्रकार म्हणून जो आत्मा माझ्यात अडकून बसलाय, तो ओरडत होता. “चहा राहू दे! तुझं नाव ‘धोंडीराम भिताडे’ आहे की