Chapter 3: मौली आजीचं इशारा चेतनच्या गायब झाल्यानंतर गावातल्या लोकांचा धीर ढासळला होता. झाडाजवळ सापडलेल्या पायाच्या विचित्र ठशांनी आणि मोबाईल, टॉर्च फेल होण्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले होते. दत्ता काका मात्र काही बोलायला तयार नव्हते. ते शांत होते, पण त्यांच्या डोळ्यांत काहीतरी लपलेलं होतं – एखादं जुनं रहस्य… किंवा अपराध? त्या संध्याकाळी गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली – "मौली आजी परत आली!" मौली आजी – गावाची वेडी की काहीतरी जास्त? गावातल्या एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहणारी मौली आजी अनेक वर्षांपूर्वी गावातून गायब झाली होती. लोक म्हणत असत की ती भोंदू, तांत्रिक प्रकार करणारी, झाडाशी काहीतरी संबंध असलेली बाई होती. पण