पाताळ विहीर

  • 489
  • 198

अंधाऱ्या विहिरीचं गूढगावाच्या वेशीवर, जिथे जुन्या वडाच्या झाडाची लांबच लांब मुळं जमिनीतून वर आली होती, तिथे एक विहीर होती. 'विहीर' म्हणण्यापेक्षा ती एक काळीशार, अथांग गर्ताच होती. गावातली जुनी जाणती माणसं म्हणायची, "या विहिरीला तळ नाही." तिच्या खोली मुळे, या विहिरीचं नाव पडलं होतं 'पाताळ विहीर'. सूर्यप्रकाशातही तिचा तळ दिसत नसे, इतकी ती खोल होती. आणि गेल्या कित्येक वर्षांत, एकही माणूस तिच्या पाण्यात उतरला नव्हता, की कोणी तिच्या जवळ थांबलं नव्हतं. रात्री तर तिचा उल्लेखही कोणी करत नसे.मी, आकाश. शहरातून भूगर्भशास्त्राचा अभ्यास करून नुकताच गावी परतलो होतो. मला स्वप्नातही नव्हतं, की ही जुनी, दुर्लक्षित विहीर माझ्या आयुष्यात इतकं मोठं गूढ