शब्द हरवले गेलेत

  • 477
  • 177

शब्द हरवले गेलेतएक प्रेमकथा, जिचा शेवट शब्दांत हरवून गेला...---ती गेल्यावर...ती गेल्यावर, खरं सांगायचं तर, घर काही बदललं नाही.तोच दरवाजा. तीच खिडकी. तोच कोपरा, जिथं आम्ही बसायचो.फक्त, घराचं शांतपण बदललं. आता ते शिळं वाटतं.मी दररोज दार उघडतो. हलक्या पावलांनी.म्हणजे जणू ती झोपली असेल आणि जागी होऊ नये म्हणून मी शांत चालतोय.चहाचे दोन कप ठेवतो. एक माझा, आणि दुसरा... तिच्यासाठी.पण त्या दुसऱ्या कपात चहा कधीच थांबत नाही.कधी कधी वाटतं, त्या कपात चहा ओतावं की नाही?मग आठवतं — ती गेली आहे. आणि गेलेल्यांसाठी चहा नाही.फक्त आठवणी असतात. गरम, तरी थोड्याच वेळासाठी.---ती – समिधातिचं नाव समिधा.नावातच एक जळणं होतं. समिधा – यज्ञात अर्पण केलेलं