स्वप्न - माझा विचार

  • 504
  • 126

स्वप्न - माझा विचार  निद्रा किंवा झोप ही तीन प्रकारची असते. निद्रा ,योगनिद्रा व चिरनिद्रा. निद्रा किंवा झोप ही शरीरासाठी आवश्यक आहे. योगनिद्रा ही एक चांगली झोप लागण्यासाठी केलेली एक ध्यान प्रक्रिया आहे. आणि चिरनिद्रा म्हणजे मृत्यू.पण आजचा विषय झोप नसून झोपल्यावर पडणारी स्वप्ने हा आहे.मला लहानपणापासून विविध प्रकारची स्वप्ने पडत असत.  मी एक बातमी वाचली की खूप स्वप्ने पडत असलेने एका महिलेने आत्महत्या केली.  मी यावर वाचन केले आणि सर्व माहिती एकत्रीत करून हा लेख लिहीला आहे.लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वाना स्वप्ने पडतात.स्वप्ने पडणे हे नॉर्मल आहे. माणसाला स्वप्नांबद्दल कुतुहुल असते की स्वप्ने का पडतात? स्वप्नांना काही अर्थ असतो का?.आपण रोज रात्री घेत असलेल्या निद्रेमध्ये स्वप्ने पडतात.स्वप्न म्हणजे घडलेल्या