जागृत देवस्थानं - भाग 2

  • 744
  • 270

उत्सव आठवड्यावर आला. सालाबाद प्रमाणे महानैवेद्य करणे भागच होते. थोडीतरी मोठी भांडी खरेदी करणे भाग होते. घर्डा कंपनीने भांडी खरेदीसाठी पंचवीस हजाराचा चेक दिला. देवस्थानचे दोन ट्रस्टी  मुंबईला रवाना झाले. मुख्य ट्रस्टी भाऊ दात्ये यांचा मुलगा  मोहन  हायकोर्टात वकिली करायचा. रहायचा. तो गिरगावला सेंट्रल सिनेमा जवळ मंडळी मुक्कामाला तिथे गेली. त्यांच्या आंघोळी -पांघोळी  भाऊनी येण्याचे प्रयोजन सांगितले. मोहन त्याना म्हणाला, “ग्रॅण्ट रोडला खोज्यांची जुनी दुकाने आहेत. त्यांच्याकडे जुन्यातली मोठी पातेली मोडीच्या दराने मिळतात. देवस्थानसाठी  अॅल्युमिनीयमच्या भांड्यांपेक्षा  जुन्यातली  तांब्या पितळेची पातेली, तपेली मिळतात का बघुया. ”        नाष्टा पाणी उरकून साडेदहाच्या सुमाराला मंडळी ग्रॅण्ट रोडला खोज्याच्या दुकानात गेली. तिथे गेल्यावर