गुरुजन

  • 357
  • 84

  (खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदराखाली लेखमाला) 3.    गुरुजन               आपल्या जिवनाचे खरे शिल्पकार हे आपले गुरु असतात. चिखलाला आकार दिल्यानंतरच त्याला महत्व प्राप्त होते. आपणही एखाद्या त्या चिखलासारखेच असतो. जोपर्यंत आपल्याला गुरु नसतो तोपर्यंत आपणही आकारहीनच असतो. गुरु आपल्याला ज्ञान देवून आपल्या जीवनाला आकार देण्याचे मोलाचे काम करतात. आई – वडीलानंतर आपले जीवन सुधारण्याचं महत्वपूर्ण काम हे गुरुच करत असतात.             गुरुही आई - वडीलांप्रमाणेच आपल्या चांगल्यासाठीच आपल्यावर रागावतात. त्यांच्या रागावण्याचे कधीच वाईट वाटून घ्यायचे नसते. ज्ञानाविना आपली किंमत कवडी मोलाचीही नसते. ज्या ज्ञानाने आपल्याला किंमत प्राप्त होते. ज्या ज्ञानामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. ते ज्ञान देण्याचं