वृद्धाश्रमात टाकणं हे पापकर्मच

  • 390
  • 108

वृद्धाश्रमात टाकणं हे पापकर्मच?           वृद्धाश्रम....... वृद्धाश्रम म्हणजे तुरुंगच असतं त्या म्हाताऱ्या लोकांसाठी. कारण तिथं मायेचं पाखरु कोणीच दिसत नाही. ना स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळविलेला मुलगा दिसत, ना स्वतःचं फोट फाडून काढलेला गर्भ दिसत. तो गर्भ, जो बालपणात हरवला असल्यास किंवा डोळ्यासमोरुन ओझल झाल्यास त्या गर्भाला उदयास आणणारी मंडळी तिनही लोक एकत्र करीत असतात नव्हे तर पिंजून काढत असतात.          एक असाच व्हिडिओ सोशल मिडीयावर येवून धडकला. ज्या व्हिडिओतून मुलामध्ये असलेला संस्कार दाखवला होता. तो संस्कार की वडिलाला विसरायचा आजार असतांना व वडील हरवले असतांना त्या मुलानं त्यांच्यासाठी बराच परीसर पिंजून काढला. शेवटी वडिलाला शोधलंच.