आई – बाबा

  • 657
  • 192

(खास विद्यार्थ्यांसाठी संस्कारमोती या सदरखाली लेखमाला) 1.आई – बाबा           विद्यार्थी मित्रांनो ! तुमच्यापैकी किती जण आपल्या आई - बाबांना त्रास देतात ? हा प्रश्न मी मुद्दामच विचारला. तुम्ही तुमच्या स्वत:च्या मनालाच हा प्रश्न विचारून पहा. तुम्ही तुमच्या आई - बाबांना त्रास देता का ?               तुम्ही त्रास देत असाल आणि देत नसाल तरीही पुढे जे लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचा. तुमचे आई - बाबा हे स्वत:साठी नाही तर फक्त तुमचं चांगलं व्हावं यासाठी कष्ट घेत असतात. तुम्हाला त्रास होवू नये म्हणून स्वत: त्रास सहन करत असतात. जे सतत तुमच्या भल्याचा विचार करतात त्यांनाच त्रास देणं कितपत योग्य आहे