पत्रकार धोंडीराम धोत्रे - 3

  • 468
  • 1
  • 144

“कोण जातो इथे?” – त्या टॉर्चवाल्याने कडक आवाजात विचारलं.प्रकाशाचा झोत थेट माझ्या डोळ्यांवर आला, आणि काही क्षण मी गोंधळलो. पण त्या प्रकाशाआडून जेव्हा चेहरा स्पष्ट दिसू लागला, तेव्हा मी पटकन ओळखलं –तो गण्याचा मामेभाऊ संत्या होता.  “© 2025 Akshay Varak – All rights reserved”)हो, हाच तो संत्या. जो लहानपणी संध्याकाळी भजन म्हणता म्हणता चुकून स्वतःलाच झपाटल्यासारखं वागायला लागला होता... आणि गावात त्याला तेव्हापासून "झपाटलेला संत्या" म्हणून ओळखू लागले.त्याच्या हातात एक जुनी काळपट टॉर्च होती. जी चालू ठेवण्यासाठी मधेच झटकावी लागते.तो तीच टॉर्च शेजारच्या पायरीवर आपटत होता, कारण कधीकधी ती जास्त प्रकाश देण्याऐवजी धूर काढते.त्याच्या चेहऱ्यावर मात्र ती टॉर्च नव्हे तर