संतांची शिकवण.

  • 357
  • 126

                     " संतांची  शिकवण "           एक लहान बाहुली असते. त्या बाहुलीला पायाकडील भागात खाली अशा प्रकारे वजन लावलेले असते की ती कशीही फेकली तरी ती जमिनीवर आडवी न पडता उभीच राहते. तसाच ईश्वर परिपूर्ण भक्तीत रंगलेला माणूस कुठल्याही प्रसंगी तो चित्तवृतीने स्थिरच असतो.          ठेविले अनंते तैसेचि राहावे |          चित्ती असू द्यावे समाधान ||   या संत वचनाप्रमाणे ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व 'माझे, माझे,' म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती