ते झाड - मागं वळून बघू नकोस - 3

  • 789
  • 429

Chapter 2 : हरवलेले पावसाचे ठसे   चेतनच्या गायब होऊन आज दुसरा दिवस होता . गावात एक विचित्र शांतता पसरली होती. घराबाहेर माणसं कमी आणि कुत्र्यांचं भुंकण जास्त . गावातल्या प्रत्येकाच्या मनात भीतीचा एक धसका निर्माण झाला होता . ज्याने चेतनला झाडाकडे जाताना पाहिलं होतं , त्याचं आता बोलायचं धाडस होत नव्हतं . प्रियंका फाटक उघडून गावच्या चावडीकडे आली. तिथे दत्ता काका , गणपत सरपंच, आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंखे चौकशी करत होते. " शेवटचं त्याला कुणी पाहिलं ? " साळुंखेंचा कडक प्रश्न. " मी पाहिलं होतं , " प्रियंका पुढे आली , आवाजात घाबरलेपणा होता . " रात्री साडेआठ वाजता