भाग ०१ : वाड्याची दंतकथा"माझं पोट... साफ होत नाही. "हो, हे ऐकल्यावर कुणालाही वाटेल, ‘काय बुवा, ह्याचं आरोग्य बिघडलंय वाटतं!’पण नाही!हे माझ्या तब्येतीचं नव्हे तर पद्धतीचं वर्णन आहे. कारण माझं पोट म्हणजे साधं पचन यंत्र नव्हे...ते एक 'ब्रेकिंग न्यूज सेन्सर' आहे! मी धोंडीराम. तोडफोड दैनिक मधला फुकटातला वार्ताहर. आई नाही, बायको नाही. जेवायला मिळालं तर बघतो, नाही मिळालं तर बातमी खातो.माझं पोटही याच शिस्तीचं . काहीतरी 'खाद्य' आलं की हळूहळू पचवायला घेतं... पण बातमी जवळ आली की? सगळं अडकतं. थांबतं. गडबडतं.एक गंमत सांगतो. जेव्हा माझ्या पोटात अकारण वळवळ सुरू होते ना...तेव्हा मी डॉक्टरकडे जात नाही, मी नगरपालिकेकडे जातो! कारण ती वळवळ म्हणजे नक्की