ते झाड - मागं वळून बघू नकोस - 2

  • 498
  • 1
  • 234

Chapter 2 : हरवलेले पावसाचे ठसे   चेतनच्या गायब होऊन आज दुसरा दिवस होता. गावात एक विचित्र शांतता पसरली होती. घराबाहेर माणसं कमी आणि कुत्र्यांचं भुंकण जास्त. गावातल्या प्रत्येकाच्या मनात भीतीचा एक धसका निर्माण झाला होता. ज्याने चेतनला झाडाकडे जाताना पाहिलं होतं , त्याचं आता बोलायचं धाडस होत नव्हतं. प्रियंका फाटक उघडून गावच्या चावडीकडे आली . तिथे दत्ता काका, गणपत सरपंच, आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंखे चौकशी करत होते . " शेवटचं त्याला कुणी पाहिलं ? " साळुंखेंचा कडक प्रश्न . " मी पाहिलं होतं , " प्रियंका पुढे आली, आवाजात घाबरलेपणा होता. "रात्री साडेआठ वाजता ... त्याने सांगितलं होतं की