समालोचन आता थोडेसे युरोप विषयी अनुभवातून मिळालेल्या व इतरांना उपयोगी पडतील अशा टिप्स आणि निरीक्षणे ..युरोपात चहा अगदी वर्ज्य आहे .भारतीयांना चहाचं व्यसन इंग्लिश लोकांनी लावले पण इंग्लंड वगळता तर युरोपमधे चहा नाही . युरोप म्हणजे सगळीकडे कॉफीचे राज्य आहे. बिन दुधाची आणि बिनसाखरेची आपल्याला ती सवय नसल्याने पांचट वाटते अशा वेळी केपेचीनो कॉफी घेणे हा उत्तम पर्याय ठरतो इथे नाश्ता म्हणजे ब्रेडचे अनेक प्रकार असतात त्यातले बरेचसे आपल्याला फारसे आवडत नाहीत अशा वेळी नाश्त्यामध्ये फळे ,फ्रुट जुस, कॉर्न फ्लेक्स ,योगर्ट घेणे हे चांगले जेवताना भात सॅलड सूप वर भर द्यायचा म्हणजे फिरण्यासाठी भरपूर चालायची ताकद टिकवता येते.इथे कुठेही सामान उचलायला हमाल मिळत नाही आपले बॅगेज आपण उचलायचे असते