सकाळ झाली होती… पण ती साधी सकाळ नव्हती. पावसाची एकसुरी सरसर चाललेली सळसळ, ओल्या मातीचा उग्र वास आणि वाऱ्याच्या झोताने वाड्याच्या भिंती चिवटपणे चरकावत होत्या. त्या जुन्या, विस्मरणात गेलेल्या वाड्याच्या तहखान्यात एक अनामिक जडपणा भरलेला होता. जणू तिथं हवाच थांबून बसली होती, काळाची नोंद घेत.त्याच तहखान्याच्या मध्यभागी एका फाटलेल्या, काळसर टेबलासमोर रुद्र शांतपणे बसलेला होता. डोळे मिटलेले नव्हते, पण हालचाल नव्हती. त्याच्या समोर नकाशा होता . एखाद्या युद्धाच्या पूर्वसंध्येसारखा.त्याच्या डोळ्यांत विचारांची धग होती. रम्या आणि राकेश अटकेत होते, पण त्याच्या डोक्यात ती 'अटक' म्हणजे शेवट नव्हे, तो होता सुरुवातीचा नाद.तो नकाशा रेखाटलेला नव्हता, तो कोरला गेलेला वाटत होता . एक