कृतांत त्या रात्री राजकन्या गौरीला झोप येईना.सतत डोळ्यासमोर आयुषचा चेहरा...त्याच निर्भीड बोलणे...त्याच धाडस व राज्याप्रती असलेले प्रेम येत होते.त्याच बरोबर आजपर्यंत आपण मस्तीत वागलो.प्रजेला कस्पटासमान मानले याचीही तिला जाणीव झाली होती.पण सध्या राज्य संकटात आहे.सारे शाक्त उठाव करून राज्य ताब्यात घेऊ शकतात आणि त्यांना साथ खुद्द महाराणी व आपल्या मामाची आहे हे एकूण तिला धक्का बसला होता. स्वतःच्या वडिलांना सावध करावे तर ते अघोऱ्यांच्या मायाजालात पुरते फसले होते. आपण नेमके काय करावे ते तिला समजत नव्हते.आयुष जे काही करु इच्छित होता त्यात त्याला साथ देणे गरजेचे वाटत होते.दुष्टांच्या हाती राज्य जाण्यापेक्षा ते योग्य माणसाकडे गेले तर प्रजेचे कल्याण होणार