सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 3

  • 552
  • 2
  • 219

 भाग ३ : पोलिसांची घडी आणि पहिला सापळासंध्याकाळच्या फुटत्या उजेडात, भंडारा पोलीस मुख्यालयाची चौथी मजला तलम नारिंगी प्रकाशात न्हाऊन निघाली होती. कॉरिडॉरमध्ये पायऱ्यांचे आवाज प्रतिध्वनित होत होते, तर कंट्रोल रूमच्या काचेमागे मॉनिटर्सवर निळ्या-हिरव्या रेषा सतत लुकलुकत होत्या. जणू शहराची धडधड त्या स्क्रीनवर झगमगतेय. याच धडधडीच्या पलीकडे, निरीक्षिका विजया राणे वेगात चालत आपल्या कॅबिनमध्ये शिरली. टेबलावर पडलेला तणाव तिच्या भुवईव्यतिरिक्त कुणालाच दिसत नव्हता, पण सगळ्यांनाच जाणवत होता. आता खेळ खरोखर गंभीर झाला होता.विजयाने आता ठाम निर्णय घेतला होता. तपासाच्या गतीला आणखी धार देण्याचा. एका लक्षवेधी अंतर्गत बैठकीनंतर तिने दोन स्वतंत्र पथकं नेमली, ज्यांचं काम स्पष्ट, आणि दिशा ठरलेली होती.पहिलं पथक —