शेतकऱ्यांनीही समाधानी असावं?

  • 339
  • 108

शेतकऱ्यांनीही समाधानी असावं?          *शेतकरी वर्गानं आनंदी व समाधानी असावं. त्यानं शिव्याशाप देवू नये. कारण शिव्याशाप हेही देवाला ऐकायला जातं व तो आपल्या शेतात सोनं पिकू देत नाही. आता कोणी म्हणतील की देव हा तर दगडाचा आहे. त्याला जीव नाही. मग तो ऐकत असेल काय? याबाबतीत सांगायचं झाल्यास देव जरी दगडाचा असला तरी त्याला सगळं कळतं. हे आपल्याला पूर, भूकंप, खगोलीय घटनेवरुन लक्षात येत असतं. तसंच आपल्याला मृत्यू येतो हा वेगवेगळ्या कारणानं. परंतु ते जरी खरं असलं तरी आजच्या विज्ञानयुगात एवढ्या सोईसुविधा असतांना मृत्यू का येतो? हे कोणालाही न उलगडलेलं कोडंच आहे. पूर, भूकंप, वादळ, भुस्खलन या