सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 2

  • 552
  • 1
  • 204

भाग २ : सावध चोरांची टोळी.              तपासाच्या ओघात विजयाने मागील काही महिन्यांत घडलेल्या दागिन्यांच्या चोरिंची सर्व केस फाईल एकत्र केल्या. तिच्या टेबलावर शेकडो पानांचा ढीग पडलेला होता, पण ती शांत डोळ्यांनी प्रत्येक घटना पुन्हा पुन्हा चाळत होती.जणू अक्षरांमध्ये कोणतातरी सूर शोधत होती.          ती ज्या ज्या केसकडे बघत गेली,त्यात एक विलक्षण समानता स्पष्ट होत होती. प्रत्येक चोरी रात्री २.४५ ते ३.१५ या अर्ध्या तासातच झाली होती. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा काही क्षणांसाठीच निष्क्रिय झाली होती. जणू एखाद्या कुशल माणसाने  ते मुद्दाम ठरवून केलं असाव. आणि प्रत्येक वेळी चोरी झालेले दागिने एकच प्रकारचे, जुन्या