नेहमी सूर्योदयानंतर उठणारी गौरी आज अगदी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठली होती. कारणही तसेच होते. आज दिवाळी होती. आज सर्व घरात लगबग, घाई गडबड चालू होती. आई स्वयंपाक घरात फराळ काढण्यात मग्न होती. आजी आजोबा,बाबा हे सर्व जण स्नान आटोपून पूजेची तयारी करत होती. काही आळसावलेली गौरी आज सणाच्या निमित्ताने उठून तयारी करत होती.तिचा नवा ड्रेस आज ती घालणार होती सकाळचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर घरातील सर्व मंडळी गप्पा करण्यात गुंतली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिची आवडती मावशी मंजू तिला भेटायला आली गौरी जाम खुश झाली.