प्राण वाचविलेला झाडाची गोष्ट

झाड म्हणजे केवळ एक वनस्पती नव्हे, तर ते एक सजीव जीवनचक्र आहे – निसर्गाचं गूढ आणि गहन रूप. झाडं आपल्याला न बोलता खूप काही शिकवतात – निःस्वार्थपणा, सहनशीलता, समर्पण आणि जीवन देण्याची तयारी.आपल्या आयुष्याचा विचार केला तर लहानपणापासून झाडं आपल्या सोबत असतात. लहान मुलं झाडांच्या सावलीत खेळतात, किशोरवयात झाडावर चढणं ही शौर्याची बाब असते, प्रेम करणारे झाडांच्या खोडांवर नाव कोरतात, वृद्ध माणसं झाडाखाली बसून शांततेचा अनुभव घेतात. एवढंच नाही, तर अनेकांची शेवटची विश्रांतीसुद्धा झाडांच्या कुशीतच होते.झाडं माणसाला शुद्ध प्राणवायू देतात. त्याच्या फांद्या, पाने, फळं, फुलं – सगळं काही कुणीतरी वापरतच असतं. आंबा, चिंच, बोरं, आवळा, नारळ यांसारख्या झाडांनी भारतात अनेकांच्या