"ती… मावशी!""कधी कधी आपली श्रद्धा ढासळते… माणसांवरचा विश्वास हलतो"माणूसपण शिल्लक आहे का, असा प्रश्न पडतो…"… आणि वाटतं, 'देव असेल तर कुठं आहे?' पण मग अचानक आयुष्यात एखादा अनुभव येतो, आणि समजतं — देव ना कुठं बाहेर आहे, ना आत… तो आहे माणसात, त्या माणुसकीच्या स्पर्शात." "धकाधकीचं आयुष्य… इथे प्रत्येक दिवस वेगळा असतो — कधी गोड, कधी कडवट. अनुभव चांगलेही येतात… आणि काही जखमा देणारेही.पण माणूस खऱ्या अर्थाने ओळखला जातो तेव्हा, जेव्हा त्याच्या आयुष्यात संकटं येतात. अशा वेळी त्याला फक्त एक हवे असतं — 'कोणीतरी हात द्यावा… कोणीतरी न बोलता समजून घ्यावं.' आणि तेव्हाच आपण नकळत म्हणतो...""कुठं भेटतो देव?मंदिरात? मशिदीत? की ग्रंथांत?या