जुनं ते सोनं? *जुनं ते सोनं. असं आपण नेहमी म्हणतो. परंतु जुनं ते सोनं, ही संकल्पना व्यवहारात वापरत नाही. त्यामुळं ती संकल्पना काही दिवसानं कालबाह्य होते. उदा. कंचे खेळणं. काल कंचे खेळत असतांना दिवस दिवसभर कंचे खेळणारी पिढी घराच्या बाहेर असायची. त्यांची तहानभूक हरवून जायची. तेच इतरही खेळाबाबत घडायचं. ज्यातून फायदाच व्हायचा. नुकसान व्हायचं नाही. परंतु आज तसं नाही. कारण आज मोबाइल काळ आलाय. आजही तहानभूक हरवते. परंतु ती तहानभूक मोबाइलवर खेळ खेळतांना हरवते. जे खेळ आपले सर्वतोपरी नुकसानच करीत असतात.* आधुनिक काळ आला व पुरातन काळातील सर्वच गोष्टी कालबाह्य ठरायला लागल्या. ज्यात खेळाचाही