हिंदी भाषा शिकायचीय? तोडगा निघणार की नाही? *हिंदी भाषा ही पहिलीपासून शिकवली जावी. असं काही तज्ञांचं मत. तसं पाहिल्यास विद्यार्थ्यांनी केवळ हिंदीच नाही तर इतरही विदेशी भाषा शिकाव्यात असंही काही तज्ञांचं मत. परंतु इथे हिंदीच भाषा शिकण्याचा गाडा अडलाय व तो राजकीय हस्तक्षेपानं अडलाय. ज्या शिक्षणात आपण नेहमीच राजकारण नको असं म्हणत आलोय. येत्या पाच जुलैला याबद्दल मनसे आणि शिवसेना पक्षाचं आंदोलन होवू घातलेलं आहे. विचार आहे की पहिलीच्या विद्यार्थ्यांचा मेंदू व ग्रहणशक्ती लहान. मग हिंदी पहिलीपासून शिकण्याची सक्ती कशाला? तसंच पहिलीपासून हिंदी जर शिकायचीच असेल तर हिंदीच्या शाळा उपलब्ध आहेत. तिथे नाव टाकावे. मराठी माध्यमाच्या