Chapter 1 : परतफेड चेतन सहा वर्षांनंतर गावात परतला होता. शहरी आयुष्य, कॉलेज, नोकरी... या सगळ्यांमध्ये अडकून गेलेल्या चेतनसाठी गाव म्हणजे फक्त आठवणीतलं एक पान होतं. पण आजोबांच्या मृत्यूनंतर गावात येणं अपरिहार्य झालं. धुळे जिल्ह्याच्या एका लहानशा गावात त्याचं लहानपण गेलं होतं – ओढ्यामागची माती, पावसात भिजणं, आणि संध्याकाळी आजीकडून ऐकलेल्या भीतीदायक गोष्टी. विशेषतः एक गोष्ट त्याच्या मनात कायम कोरली गेली होती… "ते झाड – मागं वळून बघू नकोस..." ते झाड गावाच्या सीमेजवळ होतं – एक वाकलेलं, कुरूप, काळसर झाड. गावातल्या प्रत्येक लहान मुलाला त्या झाडाची भीती वाटायची. लोक म्हणायचे, तिथं आत्मा राहतो. जो त्याच्याकडे वळून पाहतो, तो कधीच परत