शिक्षण कसं असावं? शिक्षक विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ, तो देशाचा आधारस्तंभ. तो जगाचाही आधारस्तंभच. जर विद्यार्थी मोठा झाल्यावर आपल्या शिक्षकांचा शोध घेवून त्यांच्या पायावर नतमस्तक होत असेल तर. कारण त्या नतमस्तक होण्यातून असं दिसून येतं की त्या शिक्षकाने नतमस्तक होणाऱ्या विद्यार्थ्याला चांगलं शिकवलं की ज्यातून तो घडला. मोठं स्थान प्राप्त केलं. अन् तो घडलाच नाही तर तो विद्यार्थी जवळ येणार नाही. आपल्या शिक्षकांच्या पाया पडणार नाही. नतमस्तक होणं दूरच. याबाबत दोन व्हिडिओंची माहिती देतोय. दोन्ही व्हिडिओ फेसबुकवर आहेत. एका व्हिडिओत एक मुलगा एके ठिकाणी एक शिक्षक अस्ताव्यस्त उभे असतांना आपली कार थांबवतो व त्या शिक्षकांच्या पायावर नतमस्तक होतो