मराठी शाळेकडे लोकांचा ओंढा वळेल काय? *जवळपास गतकाळातील तीस वर्ष मागच्या तीन दशकाचा काळ. या काळात मराठी माध्यमाच्या शाळेतील पटसंख्या हळूहळू कमी होवून मोडकळीस निघाल्या. त्याला अनेक कारणं आहेत. संस्थाचालकांचं शिक्षकांना चांगलं न वागवणं, पालकांच्या मानसिकता, त्यांच्या भावना, पाश्चिमात्य संस्कृती प्रभाव, मुलांना ठेवण्याचा प्रश्न. त्यातीलच एक कारण म्हणजे लोकांची मानसिकता. लोकांची मानसिकता ही इंग्रजी विषयाला जास्त महत्व देणारी आहे. जे इंग्रजी शिक्षण कॉन्व्हेंटच्या शाळेत मिळतं. तरीही शासनानं सन २००० पासून मराठी माध्यमांच्या शाळेत एक विशेष विषय म्हणून इंग्रजी विषयाचा समावेश केला. तरीही त्या विषयानं फारसा फरक पडलेला नाही. आजही इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पटसंख्या भरभरुन आहे व मराठी